Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeBusinessNews१४ ऑक्टोंबर २०२५ मंगळवार ला सावली येथे भव्य निषेध मोर्चा

१४ ऑक्टोंबर २०२५ मंगळवार ला सावली येथे भव्य निषेध मोर्चा

१४ ऑक्टोंबर २०२५ मंगळवार ला सावली येथे भव्य निषेध मोर्चा

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याविरोधात भव्य निषेध मोर्चा

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली – दि. १२/१०/२०२५ भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती मा. भूषण गवई साहेब यांचेवर दिनांक ०६/१०/२०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात विक्षिप्त मनोवृत्तीच्या मनुवादी माथेफिरू वकील राकेश किशोर तिवारी याने अवमानजनक भ्याड हल्ला केला, त्याचा निषेध मोर्चा दिनांक १४ ऑक्टोंबर २०२५ मंगळवारी रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली इथून निघणार आहे.

हा हल्ला जातीयवादी मानसिकतेतून करण्यात आला होता. हा हल्ला एक प्रकारे भारताच्या संविधानावावर करण्यात आलेला हल्ला आहे. बहुजन समाजातील एखादा व्यक्ती उच्च पदावर जाणे हे येथील सवर्ण मनुवादी मानसिकतेच्या लोकांना सहन होत नाही, म्हणून अशाप्रकारचे हल्ले करून संपूर्ण बहुजन समाजाचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे.
गेल्या अनेक शतकापासून येथील सवर्ण मनुवादी मानसिकता जातीभेद व वर्णभेदाच्या नावाखाली बहुजन समाजाचे शोषण करीत आलेली आहे. भारतीय संविधानाने प्रस्थापित व पुरस्कृत केलेल्या मानवतावादी समतेला अमान्य करण्याचे एक मोठे षडयंत्रच गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. याला छुपा पाठिंबा येथील वर्णद्वेषी सरकारचा सुध्दा आहे.

भारतात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायावर आधारित संविधान लागू झाल्यानंतर भारतातील बहुजन समाजाची होत असलेली सामाजिक, राजकीय, व आर्थिक प्रगती पाहून देशातील वर्णवर्चस्ववादी मानसिकता असलेली लोकं घाबरून गेली आहेत. म्हणून बहुजन समाजावर असे हिंसक हल्ले करून त्यांना नाउमेद करण्याचा केविलवाणा प्रयत्न हे षडयंत्रकारी लोकं करीत आहेत. हा हल्ला अशाच मानसिकतेतून घडविण्यात आला आहे.

या भ्याड हल्याचा निषेध करण्यासाठी सावली तालुक्यातील संविधान प्रेमी जनतेने निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाकरिता सर्व संविधान प्रेमी जनतेनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन सावली तालुका क्रांती मोर्चा समिती तर्फे करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News