Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeArchitectureओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा सावली तालुका काँग्रेस कमेटीची...

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा सावली तालुका काँग्रेस कमेटीची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा सावली तालुका काँग्रेस कमेटीची मागणी
हेक्टरी ५०,००० रु.आर्थिक मदत करण्याची निवेदनातून मागणी

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली:- दिनांक ०७/१०/२०२५ राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी देशोधडीला मिळालेला आहे, अनेक शेतकऱ्यांचे हाती आलेले पिक अतिवृष्टीमुळे नायनाट झाले आहे. शेतकरी संकटात मात्र सरकारने अजूनपर्यंत कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. शेतकरी वर्ग संकटात सापडला असून शासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला आहे. आजच्या या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना तातडीने दर हेक्टरी ५०,००० रु. मदत द्यावी. ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करावी अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाने सातत्याने शासनाकडे केली आहे.

शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान झालेली असल्यामुळे व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना मदत करणे आवश्यक आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी असे म्हटल्या जाते.त्यामुळे या शेतकरी राजाला हेक्टरी ५०,००० रुपयांची मदत करण्यात यावी,यासाठी हे आग्रहाचे निवेदन शेतकर्यांना ५०,००० हेक्टरी मदत देऊन सहकार्य करावे असे शासनास निवेदनातून मागणी केली आहे.

निवेदन देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर, नगराध्यक्ष साधना वाढई,माजी नगराध्यक्ष लता लाकडे,माजी सभापती प.स.विजय कोरेवार,माजी सभापती प.स.कृष्णा राऊत,माजी उपसभापती राजेंद्र पाटील भोयर,युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू पाटील ठाकरे, संचालक केशव भरडकर,संचालक अरविंद भैसारे,महिला शहर अध्यक्ष भारती चौधरी,नगरसेवक प्रीतम गेडाम,गुणवंत सुरमवार, नगरसेविका ज्योती शिंदे,प्रियंका रामटेके,सीमा संतोषवार,राधा ताटकोंडवार,जेष्ठ पदाधिकारी मोहन गाडेवार,अशोक अलाम, अनिल म्हशाखेत्री,खुशाल राऊत,अनिल गुरुनुले,प्रकाश घोटेकार,विकास पुपरेड्डीवार,डोमा शेंडे,सुनील पाल,किशोर घोटेकार,निता नरुले,अंजुताई बोरेवार ,शिला गुरुनुले, तसेंच पदाधिकारी व कार्यकर्तागणं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

पावसाचा हाहाकार शेतकरी संकटात …

पावसाचा हाहाकार शेतकरी संकटात … पावसामुळे पंचनामे करणे झाले कठीण चंद्रपूर : या वर्षाला पावसाने हाहाकार माजवला आहे. आज अनेक ठिकाणी पावसाची उघडझाप आहे, पण विदर्भात...

शेतकरी कर्जमाफीबाबत ! ‘या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागणार, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Agriculture : गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय. गत वर्षी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आम्ही कर्जमाफीची भेट...

सावली तालुका ओला दुष्काळ जाहीर करा खुशाल लोडे यांची मागणी…

सावली तालुका ओला दुष्काळ जाहीर कराशेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष खुशाल लोडे यांची मागणी सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली- दि.१७/०९/२०२५ सावली तालुक्यात माहे ऑगस्ट २०२५...

सावली तालुक्यात युरिया खताचा तुटवडा..

सावली तालुक्यात युरिया खताचा तुटवडाधान पिकावर रोगराईचा प्रादुर्भावशेतकरी संकटात सावली प्रतिनिधीरोशन बोरकर सावली- दि. १७/०९/२०२५सावली तालुक्यात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, शेतीची पेरणी झाल्यानंतर आता...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News