Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeBusinessNewsसंविधान रक्षणासाठी निर्णायक लढा, नागपूरच्या भूमीतून उठला संघर्षाचा बिगुल!

संविधान रक्षणासाठी निर्णायक लढा, नागपूरच्या भूमीतून उठला संघर्षाचा बिगुल!

संविधान रक्षणासाठी निर्णायक लढा, नागपूरच्या भूमीतून उठला संघर्षाचा बिगुल!

नागपूर : आज नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने “संविधान सत्याग्रह” पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ आणि महात्मा गांधींचे पणतू श्री. तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेचा शुभारंभ ऐतिहासिक दीक्षाभूमी येथून झाला. संविधानाचे रक्षण, देशातील एकता, बंधुता आणि शांततेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देश असून, या पदयात्रेचा समारोप २ ऑक्टोबर रोजी सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे होणार आहे.

राज्य तसेच देशभरात संविधानावर घाला घालण्याचे प्रयत्न सुरू असताना संविधानाच्या संरक्षणासाठी संघर्ष करण्याची वेळ आता आली असल्याचा ठाम संदेश या पदयात्रेतून देण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या पवित्र संविधानाची प्रत संघाला प्रदान करण्यात येईल.

या ऐतिहासिक पदयात्रेत मी आज प्रत्यक्ष उपस्थित राहून संविधान रक्षणाच्या या लढ्यात माझा ठाम सहभाग नोंदवला आणि देशातील लोकशाही मूल्यांचे जतन व संविधानाची अखंडता राखण्यासाठी एकजुटीचा संकल्प केला. यावेळी माझ्यासह सुनिल केदार, खा. श्यामकुमार बर्वे, आ. अभिजीत वंजारी, मा.आ. सुभाष धोटे, श्रीमती सुषमाताई अंधारे यांसह काँग्रेसचे अनेक मान्यवर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News