Monday, August 10, 2026
Google search engine

सावली येथे साथी प्रणाली बाबत कृषी केंद्र धारकांचे प्रशिक्षण

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली– दिनांक २९/०९/२०२५ तहसील कार्यालय सभागृह सावली येथे कृषी विभागातर्फे रब्बी हंगामाची तयारी सभा तथा साथी प्रणाली प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सावली तालुक्यातील कृषि निविष्ठा विक्रेते यांचे समवेत कृषि निविष्ठा वितरण व गूण नियंत्रण बाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
येत्या रब्बी हंगामापासून केंद्र सरकारच्या साथी पोर्टल अ‍ॅपद्वारे बियाणे विक्री केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने कृषी निविष्ट विक्रेत्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात आले. बैठकीचे अध्यक्ष स्थानी कृषि निविष्ठा विक्रेते संघांचे अध्यक्ष श्री अजय पोटवर हे होते.

साथी पोर्टल मुळे बोगस बियाण्यांची विक्री, साठेबाजी व अधिक दराने विक्री अश्या दराने बियाणे विक्री अश्या गैर प्रवृत्तीना आळा बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, असे मोहीम अधिकारी अधिकारी श्री एल. ए. कटरे यांनी यांनी स्पष्ट करून उपस्थित विक्रेते यांना प्रक्षेपका द्वारे प्रनाली वापरा बाबत प्रशक्षण दिले. तसेच कृषी विक्रेत्यांच्या शंकांचे निराकरण केले. तालुका गूण नियंत्रण निरीक्षक दिनेश पानसे यांनी कृषि निविष्ठा केंद्र संचालन बाबत माहीती देऊन महावीस्तार अँप डाउनलोड करून शेतकऱ्यांना त्याबाबत माहीती देण्याबाबत कृषि केंद्र धारकांना आव्हान केले. याप्रसंगी जिल्हा गूण नियंत्रण अधिकार एस. एम. बोडे तालुका कृषी अधिकारी ललित राऊत तसेच तालुक्यातील बहुसंख्य कृषि केंद्र धारक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News