चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन
अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक.
चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने २ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी काँग्रेस भवन, चंद्रपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. इंटकचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रभारी दत्तात्रय समर्थ आणि चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष चेतन कामडे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.
अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी ठराव क्र. ०५/२६ नुसार आयोजन समितीची नियुक्ती करण्यात आली आहे अधिवेशनाचे योग्य नियोजन, प्रभावी समन्वय आणि यशस्वी आयोजन करण्याच्या दृष्टीने विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. आगामी काळात आयोजन समितीच्या माध्यमातून अधिवेशनाच्या तयारीला वेग देण्यात येणार आहे.
या राष्ट्रीय अधिवेशनात कामगारांच्या विविध समस्या, कामगारांचे हक्क, संघटनात्मक विषय तसेच कामगार हिताच्या विविध प्रश्नांवर चर्चा तसेच बेरोजगार युवा यावर चर्चा करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशन होत असल्याने ते यशस्वी करण्यासाठी इंटकचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियपणे काम करणार आहेत.
या बैठकीला प्रफुल गज्जलवार सचिव, चंद्रपूर जिल्हा, सतीश सुंकरवार सहसचिव, चंद्रपूर जिल्हा, किरण पोरेड्डीवार मूल तालुका अध्यक्ष, अनिल कुंटावार मूल तालुका उपाध्यक्ष, आकाश ठाकरे मूल शहर अध्यक्ष, साईनाथ जिडगलवार मूल शहर उपाध्यक्ष, फुलचंद गोंगले मूल शहर सचिव, अनिल निकोडे सहसचिव मूल, भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस चे मूल तालुका अध्यक्ष पवन निलमवार,सभासद रामकुमार चिताडे, तुकाराम गुरनुले, अनिल दिकोण्डवार, रंजित येणगंटीवार, अंकुश कामडी, दिनेश गुरनुले, क्रिष्णा बोरेवार यांच्यासह इंटकचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
राष्ट्रीय अधिवेशन भव्य व यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने तयारीला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.