1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.
मूल:— गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी पोहचावे याकरीता सिंधी पंचायत मूल व आरोग्य धाम हेल्थकेअर सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने ” घर घर मे आयुर्वेद” हा सामाजिक उपक्रम 1 ऑगस्ट 2026 ला शहरात राबविण्यात येणार आहे. डॉ. ममतानी व त्यांची चमू याकरीता पुढाकार घेणार आहे.
आतापर्यंत 303 आयुर्वेद शिबीर विविध शहरात राबविण्यात आले आहेत हे विशेष. मूल शहरात सकाळी 11 ते सायंकाळी 4 पावेतो हे शिबीर श्री झुलेलाल मंदीर, ताडोबा रोड मूल येथे संपन्न होणार आहे. जीकुमार आरोग्यधाम चे संचालक डॉ. जी. एम. ममतानी व डॉ. अंजू ममतानी यांचे मागॅदशॅनात शिविरात संधिवात, लकवा, गठियावात, गाऊट, साइटिका, स्नायु पीड़ा, ऑस्टियोपोरोसिस, स्पांडिलाइटिस, स्लिपडिस्क, पी.आय.डी, फ्रोजन शोल्डर, मस्क्यूलर डिस्ट्रॉफी, पोलियो, एवैस्कुलर नेक्रोसिस (AVN), कंपवात, ऑस्टियो आर्थराइटिस, कमरदर्द, घुटने दर्द, लिगामेंट इंज्युरी, डायबिटीज, हृदय रोग, हाइपरटेंशन, हाइपरकोलेस्ट्रोल, मिर्गी, माइग्रेन, साइनोसाइटिस, दमा, पुरानी सर्दी.खांसी, थायराइड विकार, वैरिकोज वेन्स, एसिडिटी, अल्सर, कब्ज, अल्सरेटिव कोलाइटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (I.B.S.) एलर्जी, उदर विकार, किडनी व प्रोस्टेट विकार, बवासीर, पथरी, सोरिएसिस, पांढरे दाग, चर्मरोग, एक्जिमा, मानसिक विकार, नींद न आना, डिप्रेशन, एन्जाइटी, रक्तप्रदर, श्वेतप्रदर, कष्टार्तव, बांझपना (संतान न होने), स्त्रीरोग, सौंदर्य समस्याएं, मुंहासे, झाइयां, मोटापा, दुबलापन, केसांचे झडणे , असमय केस पांढरे होने, लैंगिक समस्या, इत्यादि रोगांवर निःशुल्क आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा मागॅदशॅन होणार आहे व आयुर्वेदीक उपचार सुचविण्यात येणार आहेत.
अध्यक्ष श्री अमर आयलानी व उपाध्यक्ष श्री विजय केशवानी यांनी कळविल्यानुसार शिबिरात रुग्णांची तपासणी, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर इत्यादि तपासणी व स्वास्थ्य वाटिका पत्रिका निःशुल्क दिली जाणार आहे. इच्छुक व्यक्तिनी दिनांक 01 अगस्त 2026, शनिवारी सकाळी 10 से संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शिविर स्थळी आपली नोंदणी करावी व ” घर घर में आयुर्वेद ” या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक अमर आयलानी व विजय केशवानी यांनी केले आहे.


