Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeBusinessNewsनवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न

मूल: -दि. 23 मार्च 2026 रोजी नवभारत विद्यालय मुल येथे पालक सभा आणि HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक . सी. जी .बारसागडे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वरपल्लीवार , . वाघाडे सर, सौ. वैशाली वाघमारे , सौ ममता शेंडे लसीकरण समुपदेशक, विद्यालयाच्या पर्यवेक्षीका वयात भांडारकर, जेष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी , श्री अविकांत पाल, श्री. बाटवे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन रीतसर स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ. वरपल्लीवार यांनी विद्यार्थ्यांना एच.व्ही.पी.लसीकरणाबद्दल सविस्तर माहिती दिली. सौ. वैशाली वाघमारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने वय वर्ष 14 पूर्ण आणि पंधरा वर्षे सुरू अशा विद्यार्थिनींना लसीकरण देण्याची मोहीम सुरू केली आहे या बद्दल सविस्तर माहिती दिली. .
तसेच सौ. ममता शेंडे लसीकरण समुपदेशक यांनी विद्यार्थ्यांना HPV (ह्युमन पॅपिलोमाव्हायरस) लस ही लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या HPV संसर्गापासून, विशेषतः गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer), इतर जननेंद्रियाचे कर्करोग आणि मस्से (Warts) यांपासून संरक्षण करणारी एक अत्यंत प्रभावी लस आहे. ही लस प्रामुख्याने ९ ते १४ वयोगटातील मुलींना दिली जाते, परंतु २६ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीही ती घेऊ शकतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. छत्रपती बारसागडे यांनी उपस्थित पालकांना पालक सभा आणि लसीकरण दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी का आयोजित केले याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक निलेश माथनकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कु. दिपा गोंगल मॅडम यांनी मानले. याप्रसंगी विद्यालयाच्या वर्ग 8 वी आणि 9 वी च्या विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ ‘आरोग्यम् धनसंपदा’

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ 'आरोग्यम् धनसंपदा' डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले) मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम"...

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण . मुल :  दि. 13/03/2026रोज शुक्रवारला नवभारत विद्यालय मूल येथे मुख्याध्यापक श्री.सी.जी.बारसागडे यांचे मागॅदशॅनात राष्ट्रीय हरित सेना टीम व...

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली :- दिनांक १२/०३/२०२६ सावली येथे दिनांक १५ मार्च २०२६ ला लॉयन आय...

“छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” पोंभुर्णा तालुक्यात येत्या १४ मार्च पासून राबविण्यात येत आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” पोंभुर्णा तालुक्यात येत्या १४ मार्च पासून राबविण्यात येत आहे. पोंभुर्णा, दि. २ मार्च २०२६:   महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार उपअधीक्षक भूमी अभिलेख,...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News