Monday, August 10, 2026
Google search engine
HomeBusinessNewsचंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन
अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक.
चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने २ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी काँग्रेस भवन, चंद्रपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. इंटकचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रभारी दत्तात्रय समर्थ आणि चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष चेतन कामडे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.
अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी ठराव क्र. ०५/२६ नुसार आयोजन समितीची नियुक्ती करण्यात आली आहे अधिवेशनाचे योग्य नियोजन, प्रभावी समन्वय आणि यशस्वी आयोजन करण्याच्या दृष्टीने विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. आगामी काळात आयोजन समितीच्या माध्यमातून अधिवेशनाच्या तयारीला वेग देण्यात येणार आहे.
या राष्ट्रीय अधिवेशनात कामगारांच्या विविध समस्या, कामगारांचे हक्क, संघटनात्मक विषय तसेच कामगार हिताच्या विविध प्रश्नांवर चर्चा तसेच बेरोजगार युवा यावर चर्चा करण्यात  येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशन होत असल्याने ते यशस्वी करण्यासाठी इंटकचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियपणे काम करणार आहेत.
या बैठकीला प्रफुल गज्जलवार सचिव, चंद्रपूर जिल्हा, सतीश सुंकरवार सहसचिव, चंद्रपूर जिल्हा, किरण पोरेड्डीवार मूल तालुका अध्यक्ष, अनिल कुंटावार मूल तालुका उपाध्यक्ष, आकाश ठाकरे मूल शहर अध्यक्ष, साईनाथ जिडगलवार मूल शहर उपाध्यक्ष, फुलचंद गोंगले मूल शहर सचिव, अनिल निकोडे सहसचिव मूल, भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस चे मूल तालुका अध्यक्ष पवन निलमवार,सभासद रामकुमार चिताडे, तुकाराम गुरनुले, अनिल दिकोण्डवार, रंजित येणगंटीवार, अंकुश कामडी, दिनेश गुरनुले, क्रिष्णा बोरेवार यांच्यासह इंटकचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
राष्ट्रीय अधिवेशन भव्य व यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने तयारीला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
RELATED ARTICLES

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे.

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे. नागभीड:-- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन हस्ते सुभारंभ करण्यात आलेल्या श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प़ा. महेश...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News