मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.
मूल;— उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून न. प. प़शाशनाने कायॅकुशलता दाखवून दिली. आता नगराध्यक्षा सौ. ऐकता समथॅ,बांधकाम सभापती प़शांत समथॅ व मुख्याधिकारी संदीप थोडे यांनी मान्सूनपूर्व नियोजनाकरीता प़भागवार आराखडा उभा करण्याचा सुभारंभ केला आहे.
दि. 4 जून पासून स्वता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, संबधीत अधिकारी व कमॅचारी यांनी शहरामध्ये मान्सूनपूर्व नियोजनाचा आढावा घेऊन व मान्सूनपूर्व नियोजनाची सुरवात केली.
यापुढे दररोज प्रत्येक वाडाॅत स्वता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, संबधित नगरसेवक उपस्थित होऊन आढावा घेतील, लोकांनी संवाद साधतील व लगेच अधिकारी व कमॅचारी यांना सुचना देऊन कामाला लावणार असल्याने मान्सून काळात जनतेला विशेष गैरसोयीचा सामना करावा लागणार नसल्याने शहरात आनंद व्यक्त होत आहे.
गत ४ वषॅ आधी मान्सूनपूर्व नियोजना अभावी संपुर्ण शहरात पूरस्थिती तयार झाली होती. शहरातील 800 घरांमध्ये पाणीघुसून मोठी नासधूस व मानहानी झाली होती. शहराबाहेरील पावसाचा मोठा लोंढा शहरात घुसल्याने व निचरा होण्याचे नियोजन नसल्याने गोंधळ माजला होता. गत तिन वषाॅ पासून यावर न. प. तफै उपाय योजना करण्यात आली परंतू ही उपाय योजना स्थाई नसल्याने भविष्यात जिवघेणे संकट उभे ठाकू शकेल याची जाणीव.न. प. प़शाशनास असल्याने यावर दिघॅकालीन उपाय योजनेची जनतेची अपेक्षा राहणार आहे.
काहीही असो पण नगर प़शाशनाने दि. 5 जून ला बांधकाम सभापती पैशांत समाज यांचे नेतृत्वाखाली जेसीबी लाऊन धडाधड उपाय योजना सुरू करून आपली सकारात्मक, विकासात्मक मानसिकता दाखवून दिली आहे ही बाब कौतुकास्पद ठरते.


