Tuesday, February 10, 2026
Google search engine
HomeBusinessNews" अभिष्टचिंतन सोहळा" व,"जनसेवक सन्मान" सोहळा 3 फेब्रुवारीला.

” अभिष्टचिंतन सोहळा” व,”जनसेवक सन्मान” सोहळा 3 फेब्रुवारीला.

” अभिष्टचिंतन सोहळा” व,”जनसेवक सन्मान” सोहळा 3 फेब्रुवारीला.

चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त,”जनसेवक सन्मान सोहळ्याचे,आयोजन ३ फेब्रुवारी २०२६ ला चंद्रपूर जिल्हा अंतर्गत तालुक्याचे स्थळ असलेल्या मुल नगरीमध्ये करण्यात आले आहे.
३ फेब्रुवारीला मुलं येथे होणाऱ्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा शाखा पदाधिकाऱ्यांसह दोन्ही जिल्ह्यांतील तालुका शाखा पदाधिकारी आहेत.
अभिष्टचिंतन सोहळ्याचे तथा जनसेवक सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे कार्याध्यक्ष तथा दैनिकाचे अनुभवी जेष्ठ संपादक निलेश सोमाणी असणार आहेत.
तर सहअध्यक्ष म्हणून मुल नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष ऐकताताई समर्थ असणार आहेत.
सोहळ्याचे उद्घाटक प्रमोद चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर,सत्यजित आमले उपविभागीय पोलीस अधिकारी मूल हे असणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ.बंडू रामटेके वैद्यकीय अधीक्षक जिल्हा रुग्णालय चंद्रपूर,आ.स्वप्निल मरस्कोले विभागिय व्यवस्थापक (FDCM) आगर विभाग बल्लारपूर,जिल्हा चंद्रपूर,आ.मृदुला मोटे तहसीलदार मूल,आ.संदीप दोडे मुख्याधिकारी नगर परिषद मूल हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
विशेष उपस्थिती म्हणून प्रकाश देवतळे,प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघ,प्रा.महेश पानसे राज्य उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,आ.अनूपकुमार भागर्व,ज्येष्ठ संपादक तथा विदर्भ अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,आ.राकेशजी रत्नावर उपाध्यक्ष नगर परिषद मूल हे असणार आहेत.
अभिष्टचिंतन सोहळ्याचे आणि जनसेवक सन्मान सोहळ्याचे आकर्षक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे असणार आहेत.
प्रा.महेश पानसे अभिष्टचिंतन सोहळ्याचे निमित्ताने,”जनसेवक सन्मान सोहळा आयोजकांचे म्हणणे आहे की,लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे,समाजातील अन्याय,प्रश्न व वेदनांना निर्भीडपणे वाचा फोडणारे,निःस्वार्थ भावनेने जनतेच्या सेवेसाठी सतत झटणारे राजकीय,शैक्षणिक,सामाजिक व पत्रकरिता क्षेत्रातील सत्यनिष्ठ,निर्भीड व जनसेवक वृत्तीच्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आयोजित “जनसेवक सन्मान सोहळा २०२६”, चे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा पदाधिकाऱ्यांसह दोन्ही जिल्ह्यांतील सर्व तालुका पदाधिकाऱ्यांना,”मान्यवरांची व जनसेवक सन्मान मान्यवरांची,उपस्थिती नवी ऊर्जा देणारी ठरेल असा त्यांना विश्वास आहे.
कार्यक्रम आयोजन दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ ला केले असून कार्यक्रम दुपारी १२.०० वाजता प्रारंभ होणार आहे.
कार्यक्रमाचे स्थळ,माता दुर्गा मंदिर सभागृह,चंद्रपूर रोड,मूल,जिल्हा चंद्रपूर असे आहे…
विशेष गौरव सत्य,निभींडता व समाजहितासाठी मनस्वी कार्य करणारे राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,पत्रकारिता क्षेत्रातील जनसेवक आयोजक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई,जिल्हा, चंद्रपूर व गडचिरोली पदाधिकारी यांनी विशेष विनंती केली आहे की,सर्व मान्यवर,आमंत्रित व शुभचिंतकांनी वेळेवर उपस्थित राहून या सन्मान सोहळ्याची शोभा वाढवावी.
कार्यक्रमानंतर लगेच भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES

प्राचार्य अशोक झाडे यांचा सत्कार समारंभ संपन्न

प्राचार्य अशोक झाडे यांचा सत्कार समारंभ संपन्न मूल:-- नवभारत विद्यालय मूल येथे दि.31/01/2026 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे प़ाचायॅ अशोक झाडे यांचा निरोप व सत्कार समारंभ...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा “जनसेवक सन्मान” सोहळा थाटात संपन्न.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा "जनसेवक सन्मान" सोहळा थाटात संपन्न. मूल(तालुका प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे मूल येथील माॅ दुर्गा माता सभागृहात आयोजित...

माजी विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६ जिल्हा परिषद शाळा बोरचांदली

माजी विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६ जिल्हा परिषद शाळा बोरचांदली मुल दि.३१ जानेवारी २०२६ रोज शनिवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरचांदली येथे विविध क्षेत्रात कार्यरत सर्व...

गणराज्य दिनानिमित्त उपजिल्हा रूग्णालयात विशेष कार्यक्रम.

गणराज्य दिनानिमित्त उपजिल्हा रूग्णालयात विशेष कार्यक्रम. मूल:- उपजिल्हा रुग्णालय मूल येथे 77 वा गणराज्य दिन उपजिल्हा रुग्णालयात विशेष उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. वैद्यकिय अधिक्षक...

मूल- मारोडयातील सट्टा, जुगार, अवैध दारू विक्री ची लागली नजर?

मूल- मारोडयातील सट्टा, जुगार, अवैध दारू विक्री ची लागली नजर? "सोमनाथ " पर्यटन स्थळाचा होत आहे पचका? लक्षवेधी महेश पानसे. मुल: जिल्ह्यातील मूल तालुका मुख्यालयापासून 7 कि. मी....
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News