Wednesday, July 15, 2026
Google search engine
HomeBusinessNewsभूमी अभिलेख कार्यालय पोंभुर्णा येथे महसूल फेरफार प्रकरणांच्या लोक अदालतीचे बुधवार दिनांक...

भूमी अभिलेख कार्यालय पोंभुर्णा येथे महसूल फेरफार प्रकरणांच्या लोक अदालतीचे बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजन

भूमी अभिलेख कार्यालय पोंभुर्णा येथे महसूल फेरफार प्रकरणांच्या लोक अदालतीचे बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजन

 

पोंभुर्णा : मा.जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रदीप जगताप चंद्रपूर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील उप अधीक्षक भूमि अभिलेख
चंद्रपूर/भद्रावती/वरोरा/चिमूर / ब्रम्हपूरी /नागभीड/सिंदेवाही
मुल/सावली/पोंभूर्णा /गोंडपिंपरी /बल्लारपूर/राजूरा/ कोरपना /जिवती यांना महसुली फेरफार प्रकरणांची लोक अदालत आयोजित करणेबाबतचे पत्र दिले आहे.

मा. उपसंचालक भूमि अभिलेख, नागपुर प्रदेश,नागपूर यांच्या दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजीच्या सभेतील सुचनेनुसार मा. महसुल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रलंबित फेरफार प्रकरणांसंबंधाने लोक अदालत आयोजित करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. मा.महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे हे दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी चंद्रपूर जिल्हयात विविध विभागांची आढावा सभा घेणार आहेत.त्यामुळे महसूल फेरफार प्रकरणांच्या विषया संबंधाने आढावा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्या संबंधाने जिल्ह्यातील सर्व उप अधिक्षक भूमी अभिलेख यांनी बुधवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ पूर्वी आपले स्तरावरील प्रलंबित सर्व फेरफार प्रकरणा संबंधाने फेरफार अदालत घ्यावी असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख चंद्रपूर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना पत्राद्वारे सूचित केले आहे.

त्याअनुषंगाने उप अधीक्षक भूमी अभिलेख पोंभुर्णा श्री अरुण वऱ्हाडे यांनी दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी फेरफार प्रकरणांच्या लोक अदालतीचे उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पोंभुर्णा येथे ११.०० वाजता आयोजन केले आहे.फेरफार प्रकरण लोक अदालती मध्ये निकाली काढली जाणार असल्यामुळे जनतेनी ज्यास्त ज्यास्त फायदा घ्यावा असे आवाहन उप अधीक्षक भूमी अभिलेख पोंभूर्णा श्री अरुण वऱ्हाडे कळवितात.

RELATED ARTICLES

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न. जिद्द व चिकाटी हिच यशाचा गुरुमंत्र ....... अशोकजी भैया नागभीड;--- जिद्द, चिकाटी, परिश्रम व संस्कार यातूनच सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडतात....

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा  मूल : - सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी...

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News