पावसाचा हाहाकार शेतकरी संकटात …
पावसामुळे पंचनामे करणे झाले कठीण
चंद्रपूर : या वर्षाला पावसाने हाहाकार माजवला आहे. आज अनेक ठिकाणी पावसाची उघडझाप आहे, पण विदर्भात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दर्शविला आहे. आज चंद्रपूर, गडचिरोली, आणि यवतमाळ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट, तर भंडारा, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
तसेच शुक्रवारी चंद्रपूर,गडचिरोली, आणि यवतमाळ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट असेल. ओडिशा आणि वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे तज्ज्ञनि दिली.
मध्य महाराष्ट्रातील परिस्थिती ?
शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.शुक्रवार आणि शनिवारी विदर्भ, मराठवाडा, खानदेश वगळता मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. या दोन दिवसांत राज्यात ढगाळ वातावरण राहून बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे.
पाउस अजून थांबेना परिस्थिती
२५ ते २९ सप्टेंबर दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा धोका कायम राहील. विशेषत: २७ सप्टेंबरला मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील पाच ते ६ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा आहे.
पावसामुळे मोठे नुकसान तसेच शेतकरी संकटात
राज्यात सध्या मुसळधार पावसाने खूप मोठे नुकसान केले आहे. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभी पिके पाण्याखाली गेली असून, शेतकरी संकटात आहेत. वर्ष भर बळीराजा मातीत कष्ट करून हिरवीगार रोप चार महिन्यात उगवतो पण पावसाने कहर केल्यामुले शेतकरी संकटात सापडताना दिसत आहे काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला आहे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. सततच्या पाण्यामुळे सरकारला पंचनामे करणेही कठीण झाले आहे असे दिसून येते.


